समीर वानखेडेंनी आर्यन खानचं अपहरण केलं, नवाब मलिकांच्या आरोपाने खळबळ
मुंबई, प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आज सकाळी सकाळीच गंभीर आरोप केला. समीर वानखेडेंनी आर्यन खानचं अपहरण केलं आहे, असा आरोपच नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नवाब मलिक यांनी आज सकाळी सकाळीच एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी हा गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. आर्यन खान प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मी मागणी केली होती. त्यानंतर एक नव्हे तर दोन एसआयटी स्थापन करण्यात आल्या आहेत. एक राज्य सरकारने आणि दुसरी केंद्र सरकारने स्थापन केली आहे. आता कोण वानखेडेंचा आणि त्यांच्या खासगी आर्मीचा पर्दाफाश करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, असं मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मात्र, मलिक यांनी पहिल्यांदाच वानखेडेंवर आर्यन खानच्या अपहरणाचा आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून सहा प्रकरणांचा तपास काढून घेण्यात आला आहे. यामध्ये आर्यन खान आणि समीर खान प्रकरणाचाही समावेश आहे. दरम्यान, समीर वानखेडे यांच्याकडील तपास काढून घेतल्यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली. ही तर फक्त सुरुवात आहे, अशी सूचक प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करता प्रतिक्रिया दिली आहे. समीर वानखेडे यांना पाच प्रकरणांच्या तपासावरून हटवण्यात आलं आहे. एकूण २६ प्रकरणे असून त्याची चौकशी होणं आवश्यक असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसच ही सुरुवात असून सगळी यंत्रणा स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे आणि ती आम्ही करणार, असं नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान,आर्यन खानच्या अटकेनंतर नवाब मलिक यांनी या कारवाईवरच प्रश्न उपस्थित केले होते. नवाब मलिक यांनी सातत्याने गेले काही दिवस पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभे केले होते.
त्याशिवाय समीर वानखेडे यांनी अवैध मार्गाने सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता. समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या लाइफस्टाइलवरह तसंच वानखेडे यांचं जातप्रमाणपत्र खोटं असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केले आहेत. या आरोपांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे आता आर्यन खानसह सहा प्रकरणांचा तपास दिल्ली एनसीबी करणार आहे. यामध्ये नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही समावेश आहे. अरमान कोहली, इक्बाल कासकर, काश्मीर ड्रग्ज प्रकरणाचा तपासही वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे.