भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनमहाराष्ट्र

“हे” आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क| महाराष्ट्राचे राज्यपाल
सीपी राधाकृष्णन यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला असून त्यांची आता भारताचे उपराष्ट्रपती पदी निवड झाल्याने
त्या नंतर आता महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. आता आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून कार्यभार पाहणार आहेत. आचार्य देवव्रत हे गुजरातचे राज्यपाल आहेत. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

कोण आहेत हे आचार्य देवव्रत?
एक शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी म्हणून आचार्य देवव्रत यांची ओळख असून ते सध्या गुजरातचे राज्यपाल आहेत.आचार्य देवव्रत यांनी या पूर्वी २०१५  पासून ते २०१९ पर्यंत ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. त्यानंतर ते २०१९ मध्ये गुजरातचे राज्यपाल झाले, आता त्यांच्याकडे महाराष्ट्राचा देखील पदभार सोपवण्यात आला आहे. आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!