मुक्ताईनगर येथून भर दिवसा सव्वा तीन लाख रुपये लुटले ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज अक्षय काठोके | मुक्ताईनगर येथून भर दिवसा 3.25 लाख रुपये लुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिकृत असे की निमखेडी खुर्द येथील रहिवासी रतन कडू घोडकी हे शेती व्यवसाय व प्लंबर काम करून आपला उदरनिर्वाह चालवितात आज दिनांक 12/ 6/ 25 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर येथे संत ज्ञानेश्वर पतसंस्था व महाराष्ट्र ग्रामीण बँक येथे प्लॉट खरेदी करण्यासाठी लागणारी रक्कम काढण्यासाठी आले होते.
पहिल्यांदा त्यांनी संत ज्ञानेश्वर पतसंस्था येथून 2 लाख 25 हजार रोख दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी काढून नंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मुक्ताईनगर येथून दुपारी 12.55 मिनिटाच्या सुमारास 1 लाख रुपये असे एकूण 3लाख 25 हजार रुपये रोख जवळच्या कापडी पिशवीत ठेवून निघाले असता महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या बाहेर आल्यावर मोटर सायकलने घरी जाण्यासाठी निघाले असताना बँकेच्या बाहेर गेटवर एक अनोळखी इसमाने तुझे खिशातील पैसे खाली पडले असे सांगून खाली पडलेले पैसे दाखवले मी माझी मोटरसायकल थांबून माझी पैशांचे पिशवी गाडीच्या हॅन्डलला लावून खाली पडलेले पैसे उचलण्यासाठी गाडीचे खाली उतरून पैसे उचलण्यासाठी मागे गेलो खाली पडलेले पैसे उचलून मी माझे मोटर सायकल कडे गेलो असता माझे गाडीच्या आजूबाजूला उभे असलेल्या लोकांनी मला समोर जाणारी मोटर सायकलवरील चालक यांनी तुझ्या मोटर सायकलच्या हॅन्डलची पिशवी काढून पळून जात आहे म्हणून मी मोटरसायकलचा पाठलाग करण्यासाठी मुक्ताईनगर शहरातील बोदवड चौफुली पर्यंत गेलो मात्र मला कोणी दिसून आले नाही.
म्हणून माझी खात्री झाली की माझे गाडीचे हॅन्डल ला लावलेली पैशाची पिशवी कोणीतरी अनोळखी चोरट्यांनी चोरून नेली त्यावरून अनोळखी चोरट्या विरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहे