भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमचाळीसगाव

माजी नगरसेवकार प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघांची धिंड

चाळीसगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | चाळीसगाव शहराचे २६ ऑगस्ट रोजी माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाला होता. या गंभीर घटनेनंतर चाळीसगाव शहर पोलिसांनी या प्रकरणातील प्रमुख आरोपी सोमा उर्फ सागर चौधरी याच्यासह हरीश उर्फ सनी पाटील आणि गौरव उर्फ सोनू चौधरी अशा तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी कठोर पावले उचलत त्यांना अद्दल घडावी म्हणून त्यांची रविवारी सकाळी शहरात रस्त्यावर धिंड काढण्यात आली. ही धिंड पाहण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी गोळा झाली होती. हल्ल्यामागील नेमके कारण काय? यात आणखी कोणाचा सहभाग आहे, वापरलेली शस्त्रे याबाबत पोलिस चौकशी करीत आहेत.

२६ ऑगस्ट रोजी भाजपाचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांचेवर सोमा उर्फ सागर चौधरी याच्यासह हरीश उर्फ सनी पाटील आणि गौरव उर्फ सोनू चौधरी अशा तिघांनी प्राणघातक हल्ला केला होता. त्या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. रविवार, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पोलिसांनी अटक केलेल्या या तिन्ही आरोपींची शहरातून पायी धिंड काढली.

पोलिसांनी काढलेल्या या धिंडीमुळे गुन्हेगारांवर दहशत पसरली असून ही कारवाई पाहण्यासाठी रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.आरोपींची धिंड काढल्यानंतर त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!