क्रीडाभुसावळशैक्षणिक

भुसावळचा तीर्थराज पाटील पुन्हा एकदा नॅशनल मॅच विजयी

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रोलर रिले फेडरेशन ऑफ इंडिया रोलर रिले स्केटिंग स्केटिंग असोसिएशन महाराष्ट्र आयोजित 43 व्या ऑल इंडिया रोलर रिले चैम्पियनशिप संभाजीनगर येथे दिनांक 25 एप्रिल 2025 पासून ते 27 एप्रिल 2025 पर्यंत आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेमध्ये तामिळनाडू कर्नाटक सह महाराष्ट्रातील पुणे नांदेड सोलापूर कोल्हापूर सांगली जळगाव सह अन्य भागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता की या नॅशनल लेव्हलच्या स्केटिंग स्पर्धेमध्ये भुसावळ शहरातील एन के नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी तीर्थराज मंगेश पाटील या विद्यार्थ्याने अंडर ऐट गटामध्ये तीन मॅच मध्ये एक सिल्वर दोन ब्रांज मेडल मिळवून विजय मिळवला आहे.

तिर्थराज हा या आधी गोवा येथे झालेल्या स्पर्धेत थायलंड मध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी त्याची निवड झाली होती या निवडीमध्ये त्याचे कोच सिल्वर लाईन स्पोट्स एकडमी चे पियुश दाभाडे सर दिपेश सोनार सर यांनी त्याला प्रतिक्षण दिले व मार्गदर्शन केले त्याला स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारे खेळता यावं यासाठी एन के नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूल चे प्रिन्सिपल अर्चना कोल्हे मॅडम व स्पोर्ट्स टीचर नम्रता गुरव मॅडम यांनी त्याला छान सहकार्य व मार्गदर्शन केले आहे तो जुन महिन्यात थायलंड देशामध्ये पटाया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळणार आहे.

त्याच्या निवडीबद्दल त्याचे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार अमोलभाऊ जावळे खासदार स्मिताताई वाघ आमदार श्री राजुमामा भोळे यांनी अभिनंदन केले तिर्थराज पाटील हा मुळ तळवेल येथिल रहिवासी असून हल्ली शिवशक्ती हुडको कॉलनी भुसावळ येथे राहतो तो सेवानिवृत्ति मिल्ट्री इंजिनिअरिंग सर्विस चे कर्मचारी सुभाष पाटील यांचा नातू व मंगेश पाटील यांचा मुलगा आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!