राज्यातील ७ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यातील सात बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे.
कोणत्या IAS अधिकाऱ्याची कुठे झाली बदली?
१. डॉ. अशोक करंजकर (IAS: 2009) यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, मुंबईचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२. डॉ. संजय कोलते (IAS 2010) जिल्हाधिकारी, भंडारा यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३. सुशील खोडवेकर (IAS: 2011) सदस्य सचिव, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ मुंबई यांना विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
४. सावन कुमार (IAS 2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांची जिल्हाधिकारी, भंडारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
५. नमन गोयल (IAS 2022) प्रकल्प अधिकारी, ITDP, भामरागड आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, अटापली उपविभाग, गडचिरोली यांना [मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
६. डॉ.जी.व्ही.एस. पवनदत्त (IAS 2023) सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली यांची सहायक जिल्हाधिकारी, इगतपुरी उपविभाग, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
७. श्रीमती लघिमा तिवारी (IAS 2023) सहायक जिल्हाधिकारी, बल्लारपूर उपविभाग, चंद्रपूर यांची सहायक जिल्हाधिकारी, गोंडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
