क्राईमजळगाव

दोन १७ वर्षीय व एक १५ वर्षीय अशा तीन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळविले

जळगाव , मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l एकाच शहरातील तीन अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याची घटना जळगाव शहरात घडली. जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन तर रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अशा एकूण तीन अल्पवयीन मुलींना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले.

शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १५ वर्षीय तर दुसऱ्या घटनेत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तर रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तीची आई घरकाम करण्यासाठी बाहेर गेलेली असतांना, तिच्या घरासमोर राहणाऱ्या तरुणाने तीला फूस लावून पळवून नेले. या तिघ मुलींचा शोध घेतला,अशा तीन अल्पवयीन मुलींना कोणीतरी फुस लावून पळवून नेल्याची घटना शुक्रवार दि. ९ रोजी उघडकीस आल्यानंतर मुलींच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार या बाबत अज्ञातांविरुद्ध एमआयडीसी व रामानंद नगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!