पाल येथे आदिवासी भोंगर्या सण उत्साहात साजरा
पाल, ता. रावेर. मंडे टू मंडे न्यूज. विनोद जाधव l रावेर तालुक्यातील सर्वात मोठा भोंगऱ्या बाजार पाल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव, महिला, लहान मुले या उत्सवात ढोल पथक घेऊन आपल्या पाड्या वस्ती वरील आदिवासी बंधू-भगिनी अबाल वृद्ध सहभागी होते. ढोलाच्या सुमधुर नांद निनादत होता त्यात भान हरवून आदिवासी बांधव नृत्य करताना दिसत होते. तसेच वर्षभरातून एकदा साजरा करण्यात येणाऱ्या या सणाला दिवाळी सारखा उत्सव साजरा केला जातो.

उत्सवात ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक नृत्य भोंगऱ्या बाजारात आदिवासी संस्कृतीचा अनोखा रंग बघायला मिळाला. ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक नृत्य सादर करताना आदिवासी बांधव हरवून गेले होते. परंपरागत वेषभूषा आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर आदिवासी समाजाचा सांस्कृतिक उत्सव रंगला.
ढोल-ताशांच्या निनादात पारंपरिक आदिवासी नृत्य आणि बाजारातील गजबज यामुळे संपूर्ण परिसर आनंदमय झाला होता.
तसेच बाजारात थंड पेयाची दुकानं तसेच वेगवेगळी साहित्याची दुकाने रंग तिरंगे फुलांची दुकाने रंग रंगांची दुकान पाळणा खेळणी लहान मुलांची कपडे साड्यांची दुकाने रंगबिरंगी प्लास्टिक फुलांची व इलेक्ट्रॉनिक अशी बहुतांश दुकाने नटली होती तसेच गावातील थोर व पंचमंडलिकडून या उत्सवा ची पाल येथील हनुमान दादा मंदिर येथे नारळ नारळ फोडून सुरुवात करण्यात आली.
आदिवासी बांधव नवीन कपडे परिधान करून येतात. उत्साहात प्रामुख्याने महिलावर्ग व वृद्ध वर्ग नवनवीन कपडे त्यांचे वेगवेगळे पोशाख परिधान करून येतात. या उत्साहात प्रामुख्याने दाळ्या फुटाणे, साखरेचे हार कंगन,जिलेबी ,फळे, महिलांचे दागिने दुकाने , टॅटू गोधळणारे, फोटो काढणारे, बंसरी वाल्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात होती. या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होते असते.
पूर्वी या भोंगऱ्या बाजार म्हणजे सोयरे बनवणे तसेच मुलगी मुलगा बघून त्यांच्या विवाह उपयुक्त असा सण मानला जायचा या दिवशी मुलगा मुलगी हे एकमेकांना पसंत करत व एकमेकांना गुलाल लावायचे व पळून लग्न करायचे अशी प्रथा होती पण शिक्षणामुळे त्यात खूप सुधारणा झालेली आहेत आता संस्कृती प्रमाणे लग्न लावतात असा हा आदिवासी बांधवांच्या वर्षातून एकदा येणारा सण मोठ्या उत्साहात पार पडला.