म्हाडाची परीक्षा देऊन परतत असलेल्या रावेर येथील दोन मित्रांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू
रावेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : म्हाडा परीक्षेचा पेपर देऊन नाशिक येथून दुचाकीने घरी परत येत असलेल्या रावेर तालुक्यातील दोन तरूण मित्राचा रात्री अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
यश वासुदेव महाजन (वय २२, रा.रोकडा हनुमाननगर, रावेर) हा मंगळवारी म्हाडाची परीक्षा देण्यासाठी नाशिकला गेला होता. बुधवारी परीक्षा आटोपल्यावर तो व त्याचा पुनखेडा येथील रहिवासी मित्र सुमीत पाटील दुचाकीने नाशिक येथून रावेरला येण्यासाठी निघाले. नाशिक येथून दुचाकीने रावेरला घरी परतत असतांना यश व सुमीत दिवाकर पाटील (वय २६, रा.पुनखेडा, ता.रावेर) या दोघ मित्रांचा बुधवारी रात्री जळगाव येथील जैन इरिगेशनजवळ अपघात झाला. त्यात यशचा जागीच, तर सुमीतचा जळगाव येथे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.