भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

अमळनेरक्राईमजळगाव

गावठी बनावटीचे पिस्टल विक्री साठी आलेल्या दोघांच्या मुसक्या आवळल्या, दोन पिस्टल जप्त

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | गावठी बनावटीचे पिस्टल विकण्यासाठी आलेल्या दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून त्यांच्याकडून दोन पिस्टल सह जिवंत काडतुसे आणि दोन दुचाकी असा एकूण १ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गावठी बनावटीचे पिस्टल चोपडा रोडवर विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या नुसार अमळनेर पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तात्काळ गुन्हे अन्वेषण पथकातील पोलिसांसोबत सापळा रचला. खाजगी वाहनातून पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. संत आसाराम बापू आश्रमासमोर दोन संशयित व्यक्ती उभे असताना पोलिसांना पाहून पळून जाऊ लागले. मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना मोठ्या शिताफीने पकडले.

विशाल भैय्या सोनवणे (वय १८, रा. ढेकुसिम, ता. अमळनेर) आणि गोपाल भिमा भिल (वय ३०, रा. सत्रासेन, ता. चोपडा) अशी अटक केलेल्या दोघा आरोपींचे नावे असून पोलिसांनी पकडलेल्या दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन गावठी बनावटीचे पिस्टल आणि सहा जिवंत काडतुसे मिळून आली. त्यांच्याकडे परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस शिपाई विनोद संदानशिव यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली असून, आरोपींविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर हे पुढील तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!