बोगस जन्म दाखले प्रकरणी पोलिसांची गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सुमारे २.२४ लाख अपात्र व बेकायदेशीर व्यक्तींनी महाराष्ट्रात बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे मिळवली आहेत. त्याविरोधात माझा लढा सुरूच राहणार आहे. असे माजी खासादर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी दि. १ सप्टेंबर रोजी पत्रकारांना दिली. किरीट सोमय्या यांनी
सिल्लोडमध्ये पुरावे सादर केल्यानंतर जळगावात पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेण्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.बोगस जन्म दाखले प्रकरणी गुन्हे दाखल करण्यास पोलिस टाळाटाळ करीत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
मात्र बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे मिळवली असताना त्यांची तक्रार केली असता सुद्धा पोलिसांनी गांभीर्याने प्रकरण घेतले नसून गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहेत. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले.
सोमवारी सोमय्या हे जळगावात आले होते. त्याआधी ते सिल्लोड येथे गेले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे हल्ला झाला. सोमय्या हे ११०० बनावट जन्म प्रमाणपत्रांच्या फसवणुकी संदर्भात पुरावे सादर करण्यासाठी सिल्लोड येथील पोलिस व तहसीलदार कार्यालयात गेले असता, कार्यालयाबाहेर काही जणांनी त्यांच्या वाहनावर हल्ला चढवला. मात्र सीआयएसएफ कमांडोंच्या सतर्कतेमुळे जीव वाचल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सोमय्या म्हणाले, “माझ्या वाहनावर पाच जणांनी हल्ला केला. हा प्रकार उद्धव ठाकरे गट, काँग्रेस किंवा अब्दुल सत्तार यांच्या निकटवर्तीयांनी केला असो, पण दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. सीआयएसएफ सुरक्षा दलाने वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे मी सुखरूप आहे.”
या वेळी त्यांनी जळगाव जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या ४२ बांगलादेशी नागरिकांचा मुद्दाही उपस्थित केला. “या प्रकरणात पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही. ४३ जणांनी तहसीलदारांचे खोटे हस्ताक्षर वापरून प्रमाणपत्र घेतले आहेत. त्यांना आरोपी बनवलेच पाहिजे. पोलिसांना न्यायाधीश बनण्याचा अधिकार नाही. ज्यांनी खोटी कागदपत्रे दिली आहेत, त्यांच्यावर गुन्हा नोंदवणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
सिल्लोड परिसरात मालेगाव प्रमाणे वातावरण करण्याचा कट दिसून येत आहे. बांगलादेशी व अपात्र लोकांविरोधात ठोस पावले उचलली नाहीत, तर मला थेट मुख्यमंत्र्यांशी बोलावे लागेल, असेही भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले.

