विधानपरिषद निवडणुकीपूर्वीच दोन आमदार अजितदादांच्या गळाला?
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l विधानपरिषद निवडणुकील रंगत आली असताना कोणाचे आमदार. फुटतील,कोण निवडून येणार महायुती सह महाविकास आघाडी गणित मांडत असताना समाजवादी पक्षालाही मोठा फटका बसू शकतो का? अशी चर्चा रंगली असताना सपा आमदार आणि माजी राज्यसभा खासदार अबू असीम आझम यांची आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाल्याची चर्चा आहे. दोघांमध्ये या भेटीत एक तास चर्चा झाल्याची सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार फुटण्याची चर्चा असतानाच आता अजित पवारांनी दोन आमदार गळाला लावल्याची मोठी चर्चा आहे. अबू आझमी यांच्यासह रईस शेख सुद्धा आमदार आहेत. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे.
या विधानपरिषद निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि AIMIM यांचा पाठिंबा महत्त्वपूर्ण असणार आहे. या दोन्ही पक्षांचे ३ आमदार असून त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला तर त्यांना त्यांची विजयाची शक्यता वाढणार आहे. मात्र, एआयएमआयएमने अद्याप आपली रणनीती स्पष्ट केलेली नाही.
तर दुसरीकडे, अबू आझमी आणि रईस शेख अजित पवारांच्या गळाला गेल्यास तिसऱ्या जागेवर विजयाचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीला धक्का बसू शकतो.
दरम्यान,लोकसभा निवडणुकीत अबू आझमी यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांच्या बैठकीत अबू यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत चर्चा झाली होती, अशी माहिती समोर आली होती. दुसरीकडे, आझमी यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले होते.