भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

रावेर तहसीलच्या आवारातून अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी जप्त केलेले दोन ट्रॅक्टर सह दोन जण ताब्यात

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | अवैध गौण खनिज उत्खनन वाहतूक प्रकरणी महसूल प्रशासनाने जप्त केलेले दोन ट्रॉली सह ट्रॅक्टर रावेर तहसील कार्यालयात उभे असताना रावेर तहसील कार्यालय आवारातून चोरीला गेले होते हे चोरीला गेलेले दोन्ही ट्रॅक्टर सुमारे तीन लाख ३५ हजार रुपये किंमतीचे दोन ट्रॅक्टर ट्रॉली सह रावेर पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी दोन दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबतचे वृत्त असे की अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच १६, ए एन ४४५२ व एम एच १६ पी ३४४० हे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह महसूल विभागाने रोजी जप्त केले होते. सदर ट्रॅक्टर येथील तहसील कार्यालयाच्या लावण्यात आले होते. दि. २७ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आवारातून दोन जणांनी सदर ट्रॅक्टर चोरून नेले. याबाबत मंडळ अधिकारी निंभोरा रवी शंकर वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संदीप हिरामण कोळी, महेंद्र पंजाब तायडे दोघेही राहणार सिंगनूर तालुका रावेर यांच्या विरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान रावेर पोलिसांनी तपास करत तीन लाख ३५ हजार रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर जप्त करून दोघं संशयीतांना ताब्यात घेतले. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव, अनिल बडगुजर एसडीपीओ फैजपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल पो. हवा..ईश्वर चव्हाण, प्रमोद पाटील, सुकेश तडवी श्रीकांत चव्हाण यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!