यावल तालुक्यात अवैध गौणखनीज वाहतूक करताना दोन ट्रॅक्टर जप्त
यावल, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील सातोद कोरपावली रस्त्यावर अवैध गौणखनीज वाहतूक करताना महिंद्रा स्वराज असे दोन ट्रॅक्टर आधळून आल्याने ते पकडुन यावल तहसिल कार्यालयात जमा करण्यात आले, ही कारवाई यावल येथील नायब तहसीलदार संतोष विनंते याच्या मार्गदर्शनाखाली महसुल पथकाने केली.
यात धानोरा येथील महिंद्रा ट्रॅक्टर क्रमांक MH 19 CZ 1253 रेती एक ब्रास, ट्रँक्टर मालक मनोहर सुधाकर पाटील यांचे तर दुसरे ट्रॅक्टर भालशिव येथील रवींद्र गजानन कोळी रा. भालशिव यांचे ट्रॅक्टर क्रमांक MH34,BF, 1260 एक ब्रास रेती सह भरलेले महसूल पथकास आढळून आल्याने जप्त करण्यात आले असून गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाळु माफीयांमध्ये खळबळ उडाली आहे.
ही कारवाई मीना तडवी मंडळ अधिकारी भालोद, भारत वानखेडे तलाठी भालोद, शरीफ तडवी तलाठी बोरखेडा खु., संदीप गोसावी तलाठी हिंगोणे, गजानन पाटील तलाठी डोगरकठोरा, मिलिंद कुरकुरे तलाठी दहिगाव, राजू गोरटे तलाठी सांगवी बु. यांच्या पथकाने कारवाई केली.