भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीय

दुचाकीची लक्झरी बसला धडक, भीषण स्फोटात २५ प्रवाशांचा मृत्यु

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एक भयंकर अपघाताची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही घटना आंध्र प्रदेश  मध्ये घडली. मागील काही दिवसाआधी राजस्थानमध्ये धावत्या बसला लागलेल्या आगीत काही प्रवाशांचा जीव गेला होता ती घटना ताजी असताना आता आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे एक मोठा अपघात झाला. हैदराबादहून बेंगळुरूला जाणाऱ्या बसला आग लागली. कुरनूलच्या उपनगरातील चिन्नाटेकुर येथे राष्ट्रीय महामार्ग ४४ वर कावेरी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागली. या अपघातात २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. अपघातानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शोक व्यक्त केला असून मदतीचे आश्वासन दिले आहे.

आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे एक भीषण रस्ते अपघात झाला. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका बसला आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. परंतु अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. बसमध्ये ४० प्रवासी होते. आग लागली तेव्हा १० ते १२ प्रवासी बाहेर उड्या मारून पळून गेले. बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.

मोटारसायकल बसखाली अडकली आणि स्फोट
हैदराबादहून बेंगळुरूला जाणारी बस एका मोटारसायकलला धडकली तेव्हा कल्लूर जिल्ह्यातील चिन्नाटेकुरु गावाजवळ ह अपघात झाला. मोटारसायकल बसखाली अडकली आणि स्फोट झाला, ज्यामुळे आग लगेचच संपूर्ण बसमध्ये पसरली प्रत्यक्षदर्शीच्या मते, शुक्रवारी पहाटे ३ वाजता बस बेंगळुरूव जात असताना हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी परिसरात मुसळधार पाऊस पडत होता, ज्यामुळे रस्ता निसरडा झाला होता.

ही बस हैदराबादहून बंगळूरकडे ४० हून अधिक प्रवाशांना घेऊन जात होती. पहाटेच्या सुमारास मोटारसायकलची धडक बसताच बसला आग लागली आणि काही क्षणांतच या आगीने संपूर्ण वाहनाला विळखा घातला.

बसमध्ये अंदाजे ४० प्रवासी होते. दुचाकीचा स्फोट झाल्यानंतर काही क्षणातच बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. तथापि, सुमारे १२ प्रवासी आपत्कालीन मार्गाने बाहेर पडण्यात यशस्वी झाले. स्थानिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आणि पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. तथापि, अग्निशमन दलाचे जवान पोहोचेपर्यंत बस पूर्णपणे आगीत जळून खाक झाली होती.

ओळख पटवणेही कठीण
अपघाताची तीव्रता यावरून अंदाज येऊ शकते की अनेक मृतदेह इतके जळाले होते की त्यांची ओळख पटवणेही कठीण होते. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या मते, काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्यामागचे मुख्य कारण म्हणजे, आग लागल्यानंतर बसचा दरवाजा जाम झाला आणि तो उघडला नाही, अशी माहिती डॉ. सिरी यांनी दिली. त्यांनी सांगितले की, त्यांनी एकूण २१ लोकांचा शोध घेतला आहे. यापैकी ११ मृतदेहांची ओळख पटली असून, ९ मृतदेहांची ओळख पटणे अद्याप बाकी आहे. बसच्या खिडक्यांमधून उड्या मारून बारा प्रवाशांनी आपला जीव वाचवला, परंतु त्यापैकी अनेकजण भाजले आहेत. मात्र, उर्वरित प्रवाशांना बाहेर पडता न आल्यामुळे ते आगीत अडकून होरपळले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!