भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

सरकारी कर्मचाऱ्याला केवळ शिवीगाळ करणे,म्हणजे कामकाजात अडथळा नव्हे – सत्र न्यायालयाचा निर्वाळा

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | मुंबई सत्र न्यायालयाने एक महत्वाचा निर्वाळा दिला आहे.तो म्हणजे “सरकारी कर्मचाऱ्याला केवळ शिवीगाळ करणे हा शासकीय कामकाजात अडथळा होऊ शकत नाही”. तो गुन्हा ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई सत्र न्यायालयाने एका निकालात दिला आहे.

अधिक माहिती अशी की, सांताक्रूझ रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीवर रांगेत उभ्या राहिलेल्या प्रवाशांना त्रास दिल्याप्रकरणी धर्मेंद्र आणि संजय यांना आरपीएफ जवान नंदलाल शर्मा व त्यांचे सहकार जुबेर शेख यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांनी जवानांना शिवीगाळ केली. या संदर्भात ७ जून २०१४ रोजी याप्रकरणी वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.


याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यातून धर्मेंद्र सिंग आणि संजय दुवे या संशयितांना तब्बल सात वर्षांनंतर सबळपुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. “सरकारी कर्मचाऱ्याला केवळ शिवीगाळ करणे हा शासकीय कामकाजात अडथळा होऊ शकत नाही”. तो गुन्हा ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई सत्र न्यायालयाने निकालात म्हटले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. पी. मेहता यांनी हा निकाल दिला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!