भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

मुक्ताईनगर च्या दुचाकी चोरट्याला दोन दुचाक्यांसह अटक

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | भुसावळ शहर हद्दीसह सुरत शहरातून दुचाकी लांबवणाऱ्या मुक्ताईनगरातील चोरट्याला जळगाव गुन्हे शाखेसह भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्त कारवाईत अटक केली असून आरोपीच्या ताब्यातून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. किरण उर्फ करण शालीग्राम पाटील (रा. मुक्ताईनगर, जि. जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

भुसावळ शहरातील कोर्ट आवारातून 3 फेब्रुवारी 2026 रोजी अँड. रोकडे यांची हिरोहोंडा कंपनीची एचएफ डिलक्स, क्रमांक एम.एच.39 टी.6102 ही कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल होता व ही दुचाकी किरण उर्फ करण शालीग्राम पाटील या संशयीताने चोरल्याची माहिती यंत्रणेला मिळाल्यानंतर जळगाव गुन्हे शाखेसह भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्त कारवाई करीत आरोपी करण पाटील याला अटक केली.

आरोपीकडून भुसावळातून चोरलेल्या दुचाकीसह गुजरातच्या सुरत येथून लांबवलेली हिरोहोंडा शाईन (जी.जे.05 एन.ए.6180) दुचाकी जप्त करण्यात आली. दरम्यान, अटकेतील आरोपी अट्टल असून यापूर्वी त्याच्याविरुद्ध मलकापूर पोलीस स्टेशन व भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनलाही गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच भुसावळचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमाकांत पाटील, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, कॉन्स्टेबल राहुल वानखेडे, एपीआय राहुल भंडारे, कॉन्स्टेबल राहुल भोई, नाईक नितीन चौधरी आदींच्या पथकाने केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!