ब्रेकिंग : उत्तर मध्य मुंबईतून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपची उमेदवारी!
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भाजपने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात मोठा चेहरा मैदानात उतरवला आहे. भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलं आहे. व ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपने तिकीट जाहीर केलं आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्वल निकम अशी लढत होणार आहे.
सुरुवाती पासूनच भाजपने या जागेवरील उमेदवारी राखून ठेवली होती. विद्यमान खासदार पूनम महाजन यांना तिकीट दिलं नव्हतं, त्यामुळे त्यांचा पत्ता कट होणार हे निश्चित होतं. मात्र अनेक दिवसांपासून या जागेवर भाजप कोणाला उमेदवारी देणार याबाबतची उत्सुकता होती. अखेर भाजपने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
पूनम महाजन यांना मतदार संघात होत असलेला विरोध यामुळे भाजपनं नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. उज्ज्वल निकम हे सरकारी वकील आहेत. अनेक खटल्यांमध्ये त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. दहशतवादी कसाबविरुद्ध खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
ज्ज्वल निकम यांचा परिचय
प्रख्यात वकील आणि अनेक मोठ्या खटल्यांत सरकारचे वकील
तीन दशकांहून अधिक काळ वकिलीमध्ये
बी एससी व एल एल बी फर्स्टक्लासमध्ये पास
2016 मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव
2011मध्ये राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुणे विद्यापीठाची मानद डॉक्टरेट
2009 मध्ये राष्ट्रपती प्रतिभा पाटीलच्या हस्ते साताऱ्यातील स्वातंत्र्यसैनिक उंधाळकर पुरस्कार
महाराष्ट्र टाइम्सकडून ‘स्टेट आयडॉल’पुरस्काराने गौरव
स्टार माझा वाहिनीकडून बेस्ट ऍडवोकेट पुरस्काराने गौरव
डीएनए दैनिकाकडून महाराष्ट्र रत्न पुरस्काराने गौरव
नागपूरकरांकडून दक्ष नागरिक म्हणून गौरव
महाराष्ट्र टाइम्सकडून टॉप मराठी अचिव्हर पुरस्काराने गौरव
औरंगाबामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर भीमरत्न पुरस्काराने गौरव
सरकारी वकील म्हणून लढलेले खटले
1991 कल्याण रेल्वे बाँबस्फोट खटला
1993 मुंबई साखळी बाँबस्फोट खटला
1994 पुण्यातले राठी हत्याकांड
2003 गेट वे ऑफ इंडिया व झवेरी बाजार बाँबस्फोट खटला
2003 गुलशन कुमार खून प्रकरण
2004 नदीमच्या हस्तांतरणाचा लंडनमधला खटला
2006 खैरलांजी दलित हत्याकांडाचा खटला
2006 गँगस्टर अबु सालेम प्रकरण
2006 प्रमोद महाजन हत्या प्रकरण
2008 मुंबईवरचा दहशतवादी हल्ला
2010 कोल्हापुरातले साखळी बाल हत्याकांड
2010 शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण
2016 डेव्हिड हेडली खटला