क्राईमरावेर

रावेर तालुक्यातील दोन गुन्हेगार सहा महिन्यांसाठी हद्दपार, फैजपूर प्रांताधिकाऱ्यांचा आदेश

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सण ,उत्सव त्या सोबत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्भूमीवर रावेर तालुक्यातील चोरी, प्राण्यांची कत्तल,विनयभंग, जबर दुखापत,अशी अनेक गुन्हे दाखल असलेले गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले रसलपुर येथील दोन सराईत गुन्हेगारांना फैजपूर येथील प्रांताधिकाऱ्यांनी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.

रावेर पोलिस स्टेशन हद्दीतील रसलपुर येथील शेख हुसेन शेख हसन,शेख मुस्ताक शेख ईसाक उर्फ टिंग्या या दोघांना येत्या लोकसभा निवडणुका व सण उत्सव च्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातून पुढील सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश फैजपूर उपविभागीय दंडाधिकारी देवयानी यादव यांनी काढले आहेत.रावेर पोलिस उपनिरीक्षक घन:शाम तांबे, समाधान ठाकूर,भारत पाटील यांनी या आदेशाची पुढील अंमलबजावणी केली.

दोघांना हद्दपार करण्याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह ,रावेर पोलिस निरीक्षक डॉ.विशाल जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली
रावेर पोलिस उपनिरीक्षक घन:शाम तांबे, समाधान ठाकूर,भारत पाटील यांनी प्रस्ताव सादर केला होता.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!