ब्रेकिंग न्यूज : अजिंठा घाटात ६६ प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस उलटली
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l अजिंठा घाटात एसटी बसचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे . ६६ प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस अजिंठा घाटात कलंडली आहे. या अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत असून जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात संभाजी नगर जिल्ह्यात झाल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, रावेर आगारातील बस क्रमांक (एमएच ४० वाय ५१९७) ही बस पुणे ते रावेर असा प्रवास करत असतांना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटातील फारेस्ट गेट समोरून बस जात असतांना समोरून मालवाहू टेम्पो क्रमांक (एमएच २० जीसी ७८४०) ला दुसरी बस ही तिच्या मागून ओव्हर टेक करत होती. त्यावेळी पुणे-रावेर बसवरील चालक योगेश तायडे यांचे बसवरील ताबा सुटला. त्यामुळे धावती बस रस्त्याच्या पलीकडे जावून ७ फूट खाली जावून पटली झाली. या बसमध्ये एकुण ७२ प्रवाशी होते. त्यापैकी ६ जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंत अजिंठा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.