जळगावपाचोरा

ब्रेकिंग : “दांडिया किंग” म्हणून मानकरी ठरणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

जळगाव,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l देशभरात मोठ्या उत्साहात सर्वत्र नवरात्री उत्सव साजरा केला जातो. या नवरात्री उत्सवात भाविक महिला,पुरुष, मुले – मुली दररोज रात्री देवीसमोर दांडिया खेळून जागर केला जात असतो. आणि यातच एक दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यातून समोर आली. जिल्ह्यातील पाचोरा शहरात गरबा खेळताना “दांडिया किंग” म्हणून सर्वत्र ओळख असलेल्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

नवरात्री निमित्त पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील कैलादेवी मंदिरा समोर दरवर्षी दांडिया उत्सव साजरा केला जातो. त्या प्रमाणे या वर्षीही दांडिया गरबा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू होता. या कार्यक्रमात सिंधी कॉलनी रहिवाशी असलेला लखन प्रेमलाल वाधवानी. वय २६ वर्ष. हा दांडिया खेळत असतानाच त्याची तब्येत बिघडली. त्यानंतर त्याला तत्काळ जवळील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल केले.परंतु त्यात त्याचा मृत्यू झाला.

लखन हा घरातील कर्ता व एकुलता एक मुलगा होता. तो एका पेट्रोल पंपावर काम करून आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. त्याच बरोबर लखन हा दांडिया प्रेमीमध्ये प्रसिद्ध होता. दरवर्षी ‘दांडिया किंग’चा माणकरी ठरत होता. “दांडिया किंग” म्हणून प्रसिद्ध असलेल्या लखन चा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पाचोरा शहरातील दांडिया प्रेमिंमध्ये शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!