भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावमहाराष्ट्र

खळबळजनक : अजिंठा लेणी परिसरात अज्ञात वाहनधारक ज्वलनशील केमिकलचे ड्रम फेकून पसार

अजिंठा, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्रातील अती प्राचीन म्हणून ओळखले जाणारे अजिंठा लेणी परिसरात ज्वलनशील पदार्थ सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ऐतिहासिक आणि हेरिटेज दर्जा मिळालेल्या वास्तू जवळ हे ज्वलनशील पदार्थ कसे आले, याचा तपास पोलीस करत आहेत

संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील जळगाव पासून ६० किलोमिटर अंतरावर असलेले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा वनपरिक्षेत्रामध्ये अज्ञात वाहनधारकाने वाहनातून ज्वलनशील केमिकलचे सात ते आठ ड्रम फेकून पसार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या केमिकलच्या ड्रममुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजिंठा लेणी या भारताची जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी ठळक ओळख करून देणाऱ्या महत्त्वाच्या लेणी आहेत. याच अजिंठा वनपरिक्षेत्रातील बुधनेश्वर संस्थान परिसरात अज्ञात वाहनधारकाने त्याच्या वाहनातून उग्र वासाचे ज्वलनशील केमिकलचे सात ते आठ ड्रम फेकून धूम ठोकली.हे केमिकल जमिनीवर पडताच गवत, झाडं जळून गेली आहेत. शिवाय केमिकलची दुर्गंधी जसजशी हवेत पसरली तसतसे परिसरातील नागरिकांच्या अंगाची आणि डोळ्यांची जळजळ सुरू होऊन डोकेदुखी सुरू झाली.

केमिकलमुळे होत असलेला त्रास पाहून अजिंठा परिसरात खळबळ उडाली होती, तसंच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. बुधनेश्वर संस्थान हे अजिंठा वनपरिक्षेत्र आणि फर्दापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो. हे केमिकल असलेले ड्रम अजिंठा परिसरात का फेकण्यात आले? त्या मागे काही कारणं असू शकतात का? तसंच ड्रम फेकून या व्यक्ती का पळून गेल्या? याचा शोध पोलीस घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!