युनिक इंटरनॅशनल प्ले स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न
मुक्ताईनगर , मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके l मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे आमदार चंद्रकांत पाटील, डॉक्टर प्रवीण बोदडे बालरोग तज्ञ प्रा डॉक्टर प्रतिभा ढाके फिजिकल डायरेक्टर श्रीमती जी जी खडसे महाविद्यालय या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शाळेचे संस्थापक अध्यक्ष आत्माराम मासुळे सर आणि शाळेच्या मुख्याध्यापक सौं जयश्री मासुळे यांनी शाळेतील सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्यासाठी अति उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले. हा कार्यक्रम शनिवार दिनांक 1 मार्च 2025 रोजी पार पडला.

कार्यक्रमाचे नियोजन आणि अचूक व्यवस्था बघून सर्वप्रमुख पाहुणे आणि पंचक्रोशीतील पालक मंडळी व अन्य सर्व उपस्थित यांनी मासुळे सर, मासुळे मॅडम आणि त्यांचे संपूर्ण टीमचे भरभरून कौतुक आणि अभिनंदन केले.
मुक्ताईनगर सारख्या शहरांमध्ये सर्व अद्ययावत गोष्टींनी स्वतंत्र असे व्यासपीठ प्री प्रायमरी वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणे ही अत्यंत कौतुकास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ऑलिंपियाड एक्झाम मध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचा पारितोषिक वितरण सोहळा देखील पार पडला सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन शाळेने त्यांचा अभिनंदनपर कौतुक केले.
विद्यार्थ्यांना लाभलेल्या या कलागुणांचा सर्वोत्तम पद्धतीने विकास करता यावा यासाठी गेल्या काही दिवसापासून शाळा सातत्याने प्रयत्नशील होती विद्यार्थ्यांना दर्जेदार पद्धतीने नृत्य सादर करता यावे यासाठी शाळेने विद्यार्थ्यांना शुभम तळेकार कोरिओग्राफर उपलब्ध करून दिला सर्व विद्यार्थ्यांनी अपेक्षेप्रमाणे उत्तम परफॉर्मन्स सादर केले व्हीआयपी गेस्ट,,महिला आणि पुरुष या सर्व प्रेक्षकांनी चिमुकल्यांच्या परफॉर्मन्सला उत्तम प्रतिसाद दिला एकंदरीत झालेल्या कार्यक्रमासाठी शाळेचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.