क्राईमभुसावळ

पत्नीवर अनैसर्गिक कृत्य, सासऱ्यांसह नणंदोयांचाही बलात्कार

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | बांधकाम व्यवसायासाठी माहेरून २५ लाख रुपये आणले नाहीत, या रागातून शहरातील २९ वर्षीय विवाहितेवर पतीने अनैसर्गिक बलात्कार केल्याची घटना घडली असून त्याची बरोबर सासरे आणि नंदोई यांनी देखील तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. इतकेच नाही तर घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला, तुझ्या भावाला आणि वडिलांना मारून टाकू, अशी धमकी दिल्या प्रकरणी यावल येथील पोलिस स्टेशनला पती,सासरा नंदोई सह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील माहेर असलेल्या या तरुणीचा विवाह भुसावळ शहरातील तरुणासोबत झाला असून पैशांसाठी ११ ऑक्टोबर २०२० ते ९ ऑगस्ट २०२१ दरम्यान तिचा वेळोवेळी छळ करण्यात आला. या प्रकरणी यावल पोलिस स्टेशनला पती, सासरा, नंदोई यांचे सह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे हे पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!