संतापजनक : गोवंशाच्या वासरावर अनैसर्गिक कृत्य, हिंदुत्ववादी संघटनांचे तालुका बंदचे आवाहन
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यात एका अल्पवयीन नराधमाने गोवंशाच्या वासरावर अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना समोर आली.
मुक्ताई नगर पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलाने गुरे बांधण्याच्या ठिकाणी एका गोवंशाच्या वासरावर अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना उघडकीस आली. या धक्कादायक घटनेने हिंदू धर्मियाच्या भावना दुखविल्या आहेत. या बाबत मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला जितेंद्र गजानन पाटील, रा. बेलसवाडी, मुक्ताई नगर यांनी तक्रार दाखल केली असून त्यांचेवर कलम: 299 BNS, 11(c) प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम, 119 महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासी अधिकारी सपोनी राजेंद्र चाटे हे पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान,हिंदू धर्माचं आराध्य दैवत राजमाता गौमाता
यांच्यावर बेलसवाडी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ उद्या दिनांक १५ मार्च रोजी सकल हिंदुत्ववादी संघटना यांचे वतीने मुक्ताईनगर संत भूमी / संपूर्ण मुक्ताईनगर तालुका बंद चे आवाहन करण्यात आले असून मुक्ताईनगर शहर व संपूर्ण तालुक्यातील व्यापारी व नागरिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या साठी सहकार्य करावे, असे आवाहन सकल हिंदुत्ववादी संघटनांनी केले आहे.