भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावरावेरशैक्षणिक

जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रलंबित शैक्षणिक प्रश्न तातडीने सोडवा — जुक्टो संघटना

कुंभारखेडा, ता रावेर. मंडे टु मंडे न्युज. प्रा योगेश कोष्टी | जळगाव जिल्ह्यातील उ.मा.वि./क.म.वि.शिक्षकांचे असंख्य शैक्षणिक प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. संघटनेने या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला असून शासनाकडून केवळ आश्वासनखेरीज काहीही न मिळाल्याने सदर प्रश्न आजमितीसही जैसे थेच आहेत. यामुळे शिक्षकांमध्ये कमालीचे असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे. सदर समस्या विना विलंब सोडवाव्यात अशी जोरदार मागणी आज जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीमध्ये श्री.एस.डी.भिरुड सर यांच्या अध्यक्षतेखाली व पदवीधर आमदार श्री.सत्यजितदादा तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या तक्रार निवारण सभेमध्ये करण्यात आली.

यावेळी प्रा.नंदन वळिंकार (अध्यक्ष), डॉ.अतुल इंगळे (उपाध्यक्ष), प्रा. शैलेश राणे (कार्याध्यक्ष), प्रा.सुनील गरुड (जेष्ठ मार्गदर्शक) यांनी शिक्षकांच्या समस्यांना भर सभेत वाचा फोडली. यामध्ये प्रामुख्याने थकित वेतन देयके विशेष बाब म्हणून तातडीने अदा करण्यात यावीत, सेवानिवृत्त झालेल्या उ.मा.वि./क.म.वि. शिक्षकांना सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता तातडीने देण्यात यावा, सेवानिवृत्त व मयत झालेल्या एन.पी.एस.धारकांचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत, अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव टप्पा तात्काळ देण्यात यावा, वाढीव पदावर कार्यरत उर्वरित शिक्षकांचे तातडीने समायोजन करण्यात यावे,विशेष बाब म्हणून कला शाखेची, विद्यार्थी संख्येची अट शिथिल करण्यात यावी, दरमहा नियमित वेतन होणे, घड्याळी तासिकेवरील शिक्षकांचे २०१८-१९ पासून रखडलेले वेतन त्वरित अदा करण्यात यावे, भ.नि.नि. हिशोब पावत्या तसेच एन.पी.एस.जमा रकमेचा हिशोब तातडीने देण्यात यावा पूर्ण वेळ सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक अधिकारी नियुक्त करण्यात यावा, सहाय्यक लेखाधिकारी पद गेल्या दीड वर्षापासून रिक्त असल्याने ते पद भरले जावे या व इतर असंख्य समस्यांचा समावेश होता.

यावेळी प्रा.शशिकांत पाटील (तालुकाध्यक्ष पारोळा) डॉ. संदीप पाटील (जिल्हा कार्यकारणी सदस्य) हे देखील उपस्थित होते. यावेळी आमदार श्री तांबे यांनी पीएफ पावत्या व एनपीएस हिशोब पावत्या एक महिन्याच्या आत संबंधितांना देण्यासंदर्भात निर्देश दिले.तसेच थकित वेतनासंदर्भातील अद्ययावत माहिती तातडीने देण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित केले. सदर समस्या शासन दरबारी मांडून लवकरच त्यांची उकल करण्यासंदर्भात ठोस पावले उचलले जातील असे आ.श्री सत्यजितदादा तांबे यांनी संघटनेस आश्वासित केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!