भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

मनसे नेत्याने कारमध्येच झाडल्या स्वत:वर बंदुकीच्या गोळ्या; उद्योजकाच्या आत्महत्येने खळबळ

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक (निशाद साळवे): ‘माझी गाडी चालवण्याची परिस्थिती नसून, मी सटाणाजवळील जोगेश्वरी फर्टिलायझर्स समोर उभा आहे,” असे त्यांनी मावसभावाला मोबाईलवर संपर्क साधत सांगितले. आणि दुसऱ्याच क्षणी कारमध्ये रिव्हॉल्व्हरमधून स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक बातमी आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील सिडकोतील मनसेचे नेते व महिंद्रा अँड महिंद्रामधील युनियनचे माजी पदाधिकारी  नंदलाल शिंदे (वय ५५, रा.सामोडे, ता.साक्री, जि.धुळे, सध्या रा. सिडको, नाशिक) हे उद्योजक एमएच 15 – एफटी- 0133  क्रमांकाच्या स्कोडा कारने दि.७ रोजी कारसामोडे येथून नाशिककडे निघाले होते. ते ताहाराबाद रोडवरील यशवंतनगरजवळ आल्यानंतर त्यांचे मावसभावाशी फोनवर बोलणे झाले. ‘माझी गाडी चालवण्याची परिस्थिती नसून, मी सटाणाजवळील जोगेश्वरी फर्टिलायझर्स समोर उभा आहे’, असे त्यांनी मावसभावाल सांगितले. हे ऐकल्यानंतर शिंदे यांचा मावसभाऊ व इतर दोघे नातेवाईक घटनास्थळी लगेच पोहचले, मात्र तेव्हा शिंदे हे आपल्या गाडीच्या ड्रायव्हर सीटवर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले.

उद्योजकांने कारमध्ये रिव्हॉल्व्हरमधून स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले असून सटाणा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या यशवंनगरजवळील जोगेश्वरी फर्टिलायझर्स या दुकानासमोरील हायवेवर गुरुवारी (दि.७) दुपारी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, पोलीस हवालदार नवनाथ पवार, विजय वाघ, बैरागी यांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रथम रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतली. पोलिसांनी घटनास्थळी रुग्णवाहिकेला बोलवून शिंदे यांचा मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात प. पुढील तपास सटाणा पोलिसांनी सुरू केला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!