विवाहितेचा मोबाईल मध्ये फोटो काढणाऱ्या विकृत तरूणाला पब्लिक चोप
वरणगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एका विकृत तरुणाने वरणगाव पोलिसस्टेशन हद्दीतील एका ३५ वर्षीय विवाहितेचा आपल्या मोबाईल मध्ये फोटो काढला, हा व्यक्ती विवाहितेचा नेहमीच पाठलाग करीत होता व तिच्या घरासमोर बसून तिच्या कडे एकटक लाऊन पहात बसायचा
३५ वर्षीय विवाहितेचा ऐक तरुण गेल्या तीन महिन्यापासून पाठलाग करीत होता व तिच्या घरासमोर बसून तिच्या कडे एकटक लाऊन पहात बसायचा या विकृताची हिंमत एवढी वाढली की, दि. २९ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९ ते १० वाजेच्या सुमारास पिडीत महिला पोर्चमध्ये घरकाम करीत असताना याने त्याच्या मोबाईलमध्ये विवाहितेचे फोटो काढले. पिडीत महिलेने आपल्या पतीला संबंधित तरुणाच्या विकृत वर्तनाची माहिती दिली
दुसऱ्या दिवशी तोच तरुण पुन्हा त्याच्या घरा समोर आला असता परत तसेच विकृत वर्तन करायला लागला असता तेथिल नागरिकांनी त्या तरुणाला चांगलाच चोप दीला व त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले या बाबत आरोपी चेतन गणेश तायडे याच्याविरुद्ध वरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.