भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमुक्ताईनगरराजकीय

Video:कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाचा जेवणात अळ्या आढळल्याने रोहिणी खडसे आक्रमक !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। जगभर सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातले असून सगळीकडे कोरोना चे रुग्ण आढळून येत आहेत या रुग्णाच्या उपचारावर शासन लाखो रुपये खर्च करत यातून रुग्णांचा औषधोपचार ,जेवण इतर बाबीवर खर्च केल्या जात आहे

रुग्णांना व्यवस्थित उपचार व्हावा ,सोयी मिळाव्या व रुग्ण लवकर बरे व्हावे असा शासनाचा मानस आहे
मुक्ताईनगर येथे श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालयात शासनाच्या वतीने कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड सेंटर मध्ये रुग्णांना देण्यात येणारे जेवण हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून जेवणात किडे अळ्या आढळून आल्या आहेत
असे निकृष्ट जेवण दिले तर रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन रुग्ण दगावण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. रुग्णांनी याबाबत जेवण देणाऱ्या ठेकेदार यांना विचारणा केली असता. तुम्हाला आणखी दहा दिवस काढायचे आहेत असे धमकीवजा उत्तर देण्यात येते आहे.

जेवणाच्या ठेकेदाराकडून देण्यात आलेल्या निकृष्ठ जेवणा बाबतीत एका रुग्णाने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांचेकडे तक्रार केली असता रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर तहसीलदार यांना घेऊन भाजपा पदाधिकारी यांच्यासह थेट कोविड सेंटर गाठले यावेळी तेथे असलेल्या रुग्णांनी बाहेर येऊन खिडक्यां मधून त्यांना मिळालेले निकृष्ट दर्जाचे जेवण दाखविले व आज दुपारी 3 वाजेपर्यंत जेवण मिळाले नसल्याचे सांगितले तसेच कुठलेही शासन नियमा नुसार कुठलेही प्रोटीनयुक्त जेवण मिळत नाही, औषधे वेळेवर मिळत नाही, पिण्याच्या पाण्याचे आणि आंघोळीला गरम पाणी मिळत नसल्याचे सांगितले जेवणा बाबत एका महिला रुग्णाने जेवण पुरवठा करण्याऱ्या मुलाला याबाबतीत विचारले असता तो व्यक्ती महिला रुग्णांच्या अंगावर धावून गेला रोहिणी खडसे खेवलकर यांनी तहसिलदार यांना याबाबतीत विचारणा करून जेवण पुरवठा ठेकेदार यांना समक्ष बोलावून कारवाई करण्या विषयी मागणी केली असता जेवण पुरवठा करणाऱ्या ठेकेदार यांचा माणूस येऊन तहसिलदार यांच्या समक्ष ताहसीदार व इतरांना अरेरावी करून गेला त्यावर रोहिणी खडसे यांनी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली परंतु तहसीलदार हे दबावाखाली कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते

यावर रोहिणी खडसे खेवलकर यांनी कोविड सेंटर येथुन जिल्हाधिकारी यांच्या सोबत संपर्क साधुन याबाबत तक्रार केली असता जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून कारवाई करण्या बाबत अश्वस्त केले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी कोविड सेंटर ला भेट देऊन तहसीलदार यांना तत्काळ कारवाई करून रुग्णाच्या समस्या सोडवण्याचे सांगितले यावेळी प स सभापती विद्या ताई पाटील, प स सदस्य विकास पाटील, राजेंद्र सवळे, माजी सभापती राजुभाऊ माळी, भाजयुमो ललित महाजन, दत्ता पाटील, अंकुश चौधरी,संजय तितुर, शिवराज पाटील, सुनील काटे, निलेश मालवेकर, पियुष महाजन, उपस्थित होते यावेळी भारतीय जनता पक्षातर्फे तहसीलदार यांना कोविड सेंटर येथील समस्या सोडविण्या बाबत निवेदन देण्यात आले समस्या न सोडविल्यास आंदोलनाचा ईशारा देण्यात आला

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!