Video। मुक्ताईनगर पंचायत समिती उपसभापती पदी राष्ट्रवादीच्या सुनीता चौधरी यांची निवड
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर/अक्षय काठोके। आज येथील मुक्ताईनगर पंचायत समिती उपसभापती ची निवडणूक बिनविरोध पार पडली यात उपसभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.
याबाबत अधिक असे, आज मुक्ताईनगर पंचायत समिती उपसभापती ची निवडणूक बिनविरोध पार पडली यात उपसभापती पदी सुनीता किशोर चौधरी यांची निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार श्वेता संचेती यांनी काम पाहिले. मुक्ताईनगर नगरपंचायतीचा फोडा-फोडीच्या राजकारणाचा अनुभव नवीनच असल्याने निवडीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी उपसभापती निवड प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेऊन होत्या यामुले खडसे समर्थक गटाच्या राष्ट्रवादीच्या सुनीता किशोर चौधरी यांची यापदी निवड करण्यात आली. निवड झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना रोहिणीताई खडसे म्हणाल्या की, पंचायत समितीच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा करण्याची संधी सुनीताताई चौधरी यांना मिळाली असून त्या सभापतींच्या सोबत या पदावर अतिशय उत्कृष्टरित्या काम करतील. यासाठी उपसभापतींना त्यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद तराळ, ईश्वर रहाने ,एडवोकेट पवन पाटील ,अतुल पाटील, राजू माळी ,संदीप देशमुख, अहिलास घोगरे यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते