भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावभडगाव

पाच हजारांची लाच भोवली, ग्रामसेवक व रोजगार सेवक जळगाव एसीबी च्या जाळ्यात

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | मंजूर असलेल्या घरकुलाच्या दुसरा हप्ता मिळावा व गट नंबर नमुना आठ मिळावा यासाठी सहा हजाराची मागणी केलेली होती. तडजोडी अंती ५ हजारांची लाच स्वीकारताना जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील मांडकी गावातील ग्रामसेवक आणि रोजगार सेवक यांना जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.

भडगाव तालुक्यातील मांडकी गावातील ग्रामसेवक आणि रोजगार सेवक यांच्याविरोधात घरकुल योजनेच्या दुसऱ्या हप्ता व गट नमुना ८ मिळवून देण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव (ACB) यांनी २३ जून २०२५ रोजी यशस्वी सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडले.

या प्रकरणातील तक्रारदार हे ३५ वर्षीय पुरुष असून ते भडगाव तालुक्यातील मांडकी या गावाचे येथील रहिवासी आहेत. त्यांनी ACB कडे दिलेल्या तक्रारीनुसार, मंजूर झालेल्या घरकुलाच्या दुसऱ्या हप्ता व गट नंबर नमुना ८ मिळवून देण्यासाठी ग्रामसेवक सोनिराम धनराज शिरसाठ (वय ४७, रा. पाचोरा) आणि रोजगार सेवक जितेंद्र लक्ष्मण चौधरी (वय ३८, रा. पाचोरा) यांनी एकत्रितपणे ६०००/-रुपयांची लाच मागितली होती.

या तक्रारीची पडताळणी २३ जून २०२५ रोजी पंचासमक्ष करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपींनी तडजोड करत ५०००/- रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार, याच दिवशी ACB पथकाने सापळा रचून पंचासमक्ष ५०००/-रुपयांची लाच स्वीकारताना आरोपींना रंगेहात पकडले.

या संदर्भात १)सोनिराम धनराज शिरसाठ वय ४७ वर्ष. धंदा ग्रामसेवक, मांडकी आणि अंतुरली बुद्रुक तालुका भडगाव जिल्हा जळगाव. रा. पाचोरा जि जळगाव. २) जितेंद्र लक्ष्मण चौधरी वय ३८ वर्ष. धंदा रोजगार सेवक गाव मांडकी तालुका भडगाव जिल्हा जळगाव रा पाचोरा जिल्हा जळगांव.
या दोघे आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उप अधीक्षक श्री. योगेश ठाकूर (ला.प्र.वि. जळगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी (नंदुरबार) यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव (जळगाव) कार्यरत असून विशेष पथकात स.पो.उ.नि. दिनेशसिंग पाटील, स.पो.उ.नि. विलास पाटील, पो. नाईक हेमंत पाटील आणि पो. नाईक सुभाष पावरा (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार) यांनी सहभाग घेतला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!