भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

मुक्ताईनगर मध्ये गावठी कट्टा सापडल्याने खळबळ, तरुणाला अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज, अक्षय काठोके | मुक्ताईनगर येथे गावठी कट्टा सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली असून ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली.

मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील अर्जुन जनार्दन सांगळकर कोळी या तरुणाजवळ गावठी कट्टा सापडल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेतर्फे आज करण्यात आली तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहेत.  दरम्यान मुक्ताईनगर तालुक्यातील व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली असल्या चे विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात मांडले होते. जळगाव जिल्ह्यामध्ये वाढत असलेल्या गुन्ह्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तितकेच नव्हे तर खुन व अन्याय अत्याचार, चोरी अशा गुन्ह्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे.

गेल्या आठवड्यातच मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथे एकाचा खून करण्यात आला होता तर मागील महिन्यात मुलींच्या छेडखानीचे प्रकारही झाले होते या प्रकारांमुळे मात्र खरोखरच तालुका व जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान या संदर्भात रात्री उशिरापर्यंत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!