भुसावळ मध्ये खडबळ, २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार, ५५ वर्षीय नराधम ताब्यात
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भुसावळ मध्ये २२ वर्षीय तरुणीवर ५५ वर्षीय नराधम इसमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या संदर्भात भुसावळ शहर पोलिस स्टेशनला रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा येथील २२ वर्षीय तरुणी भुसावळ मधील हुडको कॉलनीत राहत होती. हुडको कॉलनीतच तिच्या घरासमोर राहणाऱ्या राजू लालु गायकवाड वय ५५ वर्ष. या इसमाने दिनाक १७ फेब्रुवारी रोजी तरुणी घरात एकटी असल्याचा फायदा उचलत तिच्यावर अत्याचार केला. या संदर्भात भुसावळ शहर पोलिस ठाण्यात राजू लालु गायकवाड या ५५ वर्षीय नराधमावर रात्री गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी लागलीच आरोपी गायकवाड याला ताब्यात घेतले. पोलिस पुढील तपास करीत आहेत.


