विरोदे दूध उत्पादक संस्थेतर्फे जंत निर्मूलन लसीकरण व गोचीडी निर्मूलन
विरोदा, तालुका – यावल. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील विरोदे दूध उत्पादक सह सोसायटी विरोदे ता यावल या संस्थेमध्ये दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी जंत निर्मूलन लसीकरण व गोचीडी निर्मूलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
संस्थेने दूध उत्पादकांना दूध उत्तेजनार्थ म्हणून प्रत्येकी गाईला व म्हशीला स्टील मोठा डबे व जंत निर्मूलन व गोचीड निर्मल लसीकरण बाबतचे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित जळगाव दूध संघाचे संचालक नितीन नारायण चौधरी व फैजपूर सिलिंग सेंटरचे इनचार्ज सागर भंगाळे व सुपरवायझर खेमचंद पाटील यांचे स्वागत संस्थेचे चेअरमन सतीश जयराम चौधरी दिगंबर उखा चौधरी सचिव कृष्णा दिगंबर खाचणे यांच्या हस्ते करण्यात येऊन उपस्थित संस्थेचे संचालक सुधाकर पाटील नथू बऱ्हाटे, योगेश चौधरी प्रकाश निलेश खाचणे, बाळू बऱ्हाटे, विक्रम पाटील संस्थेचे दूध उत्पादक मकुंदा बऱ्हाटे, पंकज बऱ्हाटे, गजेंद्र तायडे, सुनील सोनवणे, योगेश चौधरी, विनोद बऱ्हाटे, चेतन राणे गंगाधर चौधरी, पंकज खाचणे, गोकुळ चौधरी, हरी सोनवणे यांचे मोठ्या प्रमाणात सदस्य उपस्थित होते .