आम्ही पाठिंबा काढलाय, सरकारने बहुमत सिद्ध करावे– शिंदेचे राज्यपालांना पत्रं
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : आम्ही ठाकरे सरकारचा पाठिंबा काढत आहोत. त्यामुळे सरकार अल्पमतात आलं आहे. त्यामुळे सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगा असं पत्रं एकनाथ शिंदे गटाने राज्यपालांना पत्र पाठवलं आहे. यामुळे राज्याच्या राजकारण मोठा उलथापटलथी होणार आहे.
- मुक्ताईनगर मतदारसंघातील निराशाजनक चित्र बदलवण्यासाठी रोहिणी खडसेंना निवडून द्या– शरद पवार
- ब्रेकिंग : विनोद सोनवणे गोळीबार प्रकरणात तीन संशयित ताब्यात; दोन फरार !
- मुक्ताईनगरात निवडणूकीची माहिती न देण्याऱ्या प्रशासनाच्या विरोधात पत्रकारांचा बहिष्कार
शिवसेना नेतृत्व विरुद्ध बंडखोर गट यांच्यात सुरू असलेला वाद आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत पक्षापासून दूर झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने न्यायालयात याचिका केली. आम्ही ३८ आमदारांनी राज्य सरकारचा पाठिंबा काढल्याने राज्य सरकार अल्पमतात आलं आहे, असा दावा या याचिकेत शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. शिंदे गटाची ही भूमिका समोर आल्याने राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. यात आता राज्यपालांना पत्र दिल्याने महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. बातमी अपडेट होत आहे, रिफ्रेश करत रहा.