भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव शिवारातील साखर कारखान्या समोर गाडलेले “हे” टॅंकर नेमके कशाचे?

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज.अक्षय काठोके | मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड फाट्या जवळील घोडसगाव शिवारातील साखर कारखान्यासमोरील जमिनीतील गाडलेले हे टॅंकर नेमके कशाचे?या बाबत मोठी चर्चा परिसरात रंगतेयं.

याबाबत अधिकृत असे की मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड फाट्याजवळ जमिनीत एक टँकर दोन- तीन महिन्यापासून गाडलेले असून यात बायोडीझल आहे का? अशी चर्चा रंगत आहे? किंवा येथे बायोडिझेलचा पंप सुरू होणार आहे का?

गेल्या दोन महिन्या आधी घोडसगाव शिवारात अवैध बायोडीजल पंपावर मुक्ताईनगर पोलिसांनी कारवाई करून बायो डिझेल पंप उद्ध्वस्त केला होता. त्या ठिकाणी सुद्धा परत पंप सुरू होणार असल्याची चर्चा आहे.

बायोड डिझेलच्या पंपामध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांचा सहभाग?
अनधिकृत असलेल्या बायोडिझेल पंपामध्ये राजकीय पदाधिकारी भागीदार असल्याची माहिती मिळत आहे?

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!