भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराष्ट्रीय

केंद्रीय अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग?

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी 2026 रोजी देशाचा अर्थसंकल्प मांडला. निर्मला सीतारमण यांनी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. आम्ही देशातील गरिबी निर्मूलनासाठी महत्वाचे काम केले. देश गेल्या 12 वर्षांपासून प्रगतीपथावर आहे. देशात गुंतवणुक वाढीला लागली आहे. भारताची विकसीत भारताकडे वाटचाल सुरू राहील. जीएसटी सोप बनवणं आणि रोजगाराच्या संधी वाढवणं हे आमचं उद्दिष्ट आहे, असं निर्मला सीतारमण यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या 2026-27 च्या अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग झालंय, पाहा संपूर्ण यादी…

2026-27 च्या अर्थसंकल्पात काय स्वस्त झालं?

कॅन्सरची औषधं

मधुमेहाची औषधं

कपडे

चामड्याची बूटं

क्रीडा साहित्य

मोबाईल फोन

ईव्ही बॅटरी

सीएनजी

वैद्यकीय उपकरणे

एलसीडी

एलईडी

भारतात बनवलेले कपडे

ईव्ही वाहने

मोटारसायकल

फ्रोझन मासे

ईव्ही लिथियम बॅटरी

वैद्यकीय उपकरणे

लिथियम आयन बॅटरी

अपघात विमा

काय महाग झालं?
इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले

सौर पॅनेल

खनिज

दारु

पीव्हीसी फ्लेक्स शीट्स

निर्मला सीतारमण यांच्या मोठ्या घोषणा-

  • राष्ट्रीय हातमाग धोरण कारागिरांना प्रोत्साहन आणि समर्थन प्रदान करेल. शैक्षणिक संस्थांकडून तांत्रिक सहाय्य शक्य होईल. मेगा टेक्सटाइल पार्क स्थापन केले जातील.
  • महात्मा गांधी ग्राम स्वराज – खादीला प्रोत्साहन देण्यासाठी – उत्पादन, प्रशिक्षण आणि विपणनासाठी असेल.
  • एक जिल्हा, एक उत्पादन याला प्रोत्साहन दिले जाईल.
  • क्रीडा – उपकरणे डिझाइन आणि उत्पादन करण्याची योजना आहे.
  • औद्योगिक समूह – पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान सुधारण्यासाठी एक योजना तयार करण्यात आली आहे.
  • एमएसएमईसाठी – सूक्ष्म उद्योगांना मदत करण्यासाठी स्वावलंबी भारत निधी तयार केला जाईल.
  • सरकारी संस्थांना अल्पकालीन मॉड्यूलर अभ्यासक्रम डिझाइन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. टियर 2 आणि 3 स्तरांपर्यंत प्रशिक्षण दिले जाईल.
  • मालवाहतुकीसाठी मालवाहतूक कॉरिडॉर बांधले जातील
  • 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या टियर-2 आणि 3 शहरांच्या विकासासाठी ₹11.2 लाख कोटींचे वाटप करण्यात आले आहे. 2026-27 मध्ये ही रक्कम 12.2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवली जाईल.
  • खासगी विकासकांसाठी पायाभूत सुविधा जोखीम हमी निधी तयार करण्यात आला आहे. सरकार अंशतः हमी देईल.
  • मालवाहतुकीसाठी एक समर्पित फ्रेट कॉरिडॉर बांधला जाईल. पूर्वेकडील दानकुनी ते पश्चिमेकडील सुरत या बंदराला जोडण्याची योजना देखील आहे.
  • वाराणसी आणि पटना विकसित करून अंतर्गत जलमार्ग विकसित केले जातील.
  • 7 हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधले जातील.
  • देशातील सीप्लेन उत्पादकांना पाठिंबा दिला जाईल.
  • मुंबई ते पुणे,
    पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते बेंगळुरू, हैदराबाद ते चेन्नई आणि सिलिगुडी ते वाराणसी यासह सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधले जातील.
  • विकसित भारतासाठी एक उच्चस्तरीय बँकिंग समिती स्थापन केली जाईल.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!