भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

त्या रात्रीच्या दरोड्यातील ८ ते १० लाख असलेले ते “गाठोळे” गेले कुठे? नागरिकांमध्ये होते गाठोळ्याची चर्चां

मुक्ताईनगर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर शहरामध्ये दिनांक २३ ऑगस्ट बुधवारी रात्री साडेआठच्या दरम्यान मुक्ताईनगर येथील बोदवड चौफुली वर मुक्ताईनगर पोलीस कर्मचारी यांनी सिने स्टाईल प्रमाणे जामनेर वरून येणारी ईरटीगा गाडी अडवून ज्या दरोडेखोरांना जेरबंद केले त्या गाडीमध्ये ८ ते १० लाख रुपयाची रक्कम असलेले ” गाठोळे ” देखील होते असे परिसरात बोलले जात असून ते गाठोळे नेमके गायब झाले कसे ? कुठे गेले? कोणाला दिले? या बाबत चार्चना उधाण आले आहे.

मुक्ताईनगर पोलिसांकडून ८ दरोडेखोराना जेरबंद करत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगत असून ज्या ढाबा/हॉटेलवर हा दरोडा पडला त्या हॉटेलवर कायमस्वरूपी क्लब चालत असल्याचे चर्चा असून बोलले जाते, हॉटेल मालक जामनेर येथील विशिष्ट राजकीय नेत्यांचे जवळचे असल्या कारणामुळे गाठोळे दाबण्यात तर आले नाही ना की त्याची प्रशासकीय लेवललाच विल्हेवाट लावली ? असे सुज्ञ नागरिकांमधे बोलले जात असून तशी चर्चा रंगली आहे.

याआधी मध्यप्रदेशातील दरोडेखोरांनी जिल्हयातील जुगार अड्ड्यावरून लाखो रुपयांची लूट करून नेले असल्याची माहिती मिळत आहे, यांनी जळगाव जिल्ह्यामध्ये काही विशिष्ट क्लब वरच दरोडा टाकल्याचे बोलले जात आहे रावेर तालुक्यातील सावदा येथील सावदा-रावेर रोडवरील मोठ्या जुगार अड्ड्याच्या क्लबवर त्यास रात्री नऊ वाजेच्या सुमारास, तसेच महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या चोरवड येथील जुगार अड्ड्यावर त्याप्रमाणे मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड या जुगार अड्ड्यांवर लाखो-करोडो रुपयांची उलाढाल होत असलेल्या क्लब वरच दरोडेखोर दरोडा टाकत असतात अशी देखील माहिती नागरिकांच्या चर्चेतून समोर आली आहे.

परीसरात अशीही चर्चा आहे की, लाखोंची किंमत असलेली इरटीगा गाडी मधून दरोडेखोर वापरत असताना मग हे ६० आणि ७० हजार लुटायला त्या हॉटेलवर गेले असतील का ? असा प्रश्न देखील सुज्ञ नागरिक उपस्थित करत आहे, त्या अर्थी हॉटेलच्या क्लब वर मोठी बक्कळ रक्कम असल्याचे देखील बोलले जात आहे, गाठोळे कुठे फेकले किंवा कोणाला दिले याबाबत नागरिकांकडून प्रश्न चिन्ह उपस्थित होत असून अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. या प्रकरणातील लाखोंची गाठोळी लाटणारे कोण ? अशा चर्चेसही उधाण आले आहे.

कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली– मुक्ताईनगर शहरामध्ये जी ईरटीगा गाडी पकडली गेली ती गाडी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला आणण्यात आली होती. पोलीस स्टेशन आवारात डीवायएसपी राजकुमार शिंदे व सहकारी वर्ग त्या गाडीची सखोल चौकशी करत असताना मुक्ताईनगर येथील पत्रकार, अधिकारी वर्ग चौकशी करतानाचा व्हिडिओ बातमी कव्हर करण्यासाठी व्हिडिओ काढत होते परंतु त्या ठिकाणी डीवायएसपी शिंदे यांनी पत्रकाराना वृत्तसंकलन करू देण्यास विरोध करत मोबाईल हिसकावून व्हिडिओ शूटिंग का काढत आहे असा आरोप करून मोबाईल मधली व्हिडिओ शूटिंग डिलीट केली व रिसायकल मध्ये असलेली सुद्धा डिलीट कर असे कर्मचाऱ्याला सांगून संपूर्ण मोबाईल मधले व्हिडिओ शूटिंग व फोटो डिलीट करण्यात आले नेमके या व्हिडिओ डिलीट करण्या मागचे कारण काय होते? जामनेर येथील राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्याचा हॉटेलवर हा दरोडा पडला आहे म्हणून तर त्या गाडीची व्हिडिओ शूटिंग मोबाईल वरून डिलीट केली गेली का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

हे ही बातमी वाचा– मुक्ताईनगर पोलिसांनी ८ दरोडेखोर पकडले; मात्र, चर्चेला उधाण… जुगार अड्ड्यावर बंदूकधाऱ्यांकडून दरोडा पडल्याच्या ?

सामान्य नागरिक देखील पोलीस आवारामध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये व्हिडिओ शूटिंग काढू शकतो असा निर्णय सुप्रीम कोर्टाने देखील दिलेला आहे, असे असताना डी वाय एस पी त्या आदेशाला केराची टोपली दाखवत कोर्टाचा अवमान करताना दिसून येत असल्याचे बोलले जात असून, तरी वरिष्ठ अधिकारी यावर लक्ष केंद्रित करून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करतील का असा प्रश्न देखील सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात असून मोठी चर्चा होताना दिसून येत आहे, डीवायएसपी सारखे अधिकारी जर कोर्टाचा अवमान करत असतील तर सामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न देखील नागरिकांना उपस्थित होत आहे. की त्या गाडीमध्ये पैशाचे गाठोळे होते म्हणून व्हिडिओ डिलीट करण्यात आला का ? असा देखील प्रश्न पत्रकारांना व नागरिकांना पडला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!