भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमचोपडाजळगाव

आदिवासी तरुणांची चौकशी करताना त्यांना किळसवाणे अश्लील लैंगिक चाळे करण्यास भाग पाडले, पोलिस उपनिरीक्षक निलंबित

चोपडा, जिल्हा – जळगाव. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भिल्ल आदिवासी समाजातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या तक्रारदाराच्या आरोपावरून तीन तरुणांना व एका महिलेला पोलिस उप निरीक्षक यांनी पोलिस स्टेशनला बोलावून गावातील तुमच्या समाजातील जो मुलगा मुलीला घेऊन पळाला आहे. त्याच्यात तुमचा हात असल्याचे सांगितले परंतु या घटनेशी आमचा तिळमात्र सबंध नाही असे सुषमाताई भील यांनी सांगितले. म्हणून पोलिस उप निरीक्षक साजन नार्हेडा त्याचा राग आला व त्यांनी तिघा तरुणाना पट्ट्याने अमानुष मारहाण करत त्यांना किळसवाणे अश्लील लैंगिक चाळे करण्यास भाग पाडून त्यांचा लैंगिक छळ केला. तसेच महिलेला अश्लील शिवीगाळ केली. हा प्रकार जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन मध्ये घडला.
या प्रकरणात बहुजन समाज पार्टीने  तक्रार केली आहे. या प्रकरणी संबंधित सज्जनसिंह नार्हेडा या पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे

चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गेल्या २२ तारखेला चोपडा तालुक्यातील वराड गावातील एका भिल्ल आदिवासी समाजाची अल्पवयीन मुलगी व मुलगा हे प्रेम विवाह करण्यासाठी पळून गेले. म्हणून मुलीचे आई-वडीलांनी आपल्या मुलीला पळवण्यामागे गावातील सुषमा दिलीप भिल्ल, विलास सुकलाल भिल्ल, इंदर मुन्ना भिल्ल, गोविंदा उखा भिल्ल हे असल्याची तक्रार केली.

पोलीस उपनिरीक्षक सज्जनसिंह नार्हेडा यांनी चारही लोकांना पट्ट्याने बेदम मारहाण केली त्या नंतर त्यातील तिघे तरूणांना अंगावरील कपडे काढण्यास प्ररावृत केले. हे पोलीस उपनिरीक्षक महाशय एवढ्यावर न थांबता त्यांनी चक्क त्यांना नागडे करून मारहाण करीत त्यांना परस्परांशी अश्लील घाणेरडे लैंगिक चाळे करायला भाग पाडले.

हा घाणेरडा प्रकार पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस ठाण्यात केल्याचे म्हटले जात आहे. एका महिलेला सुद्धा अश्लील शिवीगाळ करून तिला मारहाण केल्याची तक्रार महिलेने केली आहे.

पोलीस उपनिरीक्षक सज्जनसिंह नार्हेडा यांना या घटनेनंतर तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या गंभीर घटनेनंतर संबंधित पीडित तरुणांच्या कुटुंबियांनी तसेच एकलव्य संघटनेने तक्रार केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करुन त्याची चौकशी करण्यात येत आहे. चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून या तिघा तरुणांना पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यानंतर तिन्ही तरुणांना पट्ट्याने अमानुषपणे मारहाण करत एकमेकांसोबत लैंगिक चाळे करायला भाग पाडल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे.

हा  घाणेरडा प्रकार चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या लक्षात आला असता त्यांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न करता पोलीस उपनिरीक्षक नार्हेडा यांना तडकाफडकी निलंबित करण्याची शिफारस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्या कडे पाठवली.

यासंदर्भात संबंधित निलंबित पोलीस उपनिरीक्षक साजन नार्हेडा यांची विभागीय चौकशी सुरू असून चौकशी दरम्यान जे काही निष्पन्न निघेल त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असे चोपड्याचे डीवायएसपी आण्णासाहेब घोलप यांनी सांगितले.

दरम्यान, आदिवासी समाजातील पुढाऱ्यांकडून या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्या कडे निवेदन स्वरूपात देण्यात आले पोलीस उपनिरीक्षक साजन नार्हेडा यांच्या वर रितसर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!