“गद्दार कुणाला म्हणतो रे ? बाहेर भेट मी बघतो” शंभूराज देसाई विरुद्ध अनिल परब यांच्यात शाब्दिक चकमक
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |विधान परिषदेच्या सभागृहात आज मुंबईत मराठी माणसाला घरांसाठी आरक्षण मिळावे या मुद्द्यावर राज्य सरकारचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई आणि शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार अनिल परब यांच्यात सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासाला तु तु मे मे असा सामना रंगून या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
त्यातच चिडलेल्या शिवसेना उबठा चे आमदार अनिल परब यांनी शिंदे गटाचे नेते मंत्री शंभूराज देसाईंना गद्दार असं संबोधलं. त्या नंतर शंभूराज देसाईंनी “गद्दार कुणाला म्हणतो रे? बाहेर भेट मी बघतो” असं म्हणत अनिल परब यांना ललकारलं. हा वाद इतका वाढला की विधान परिषदेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करावं लागलं.
शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत म्हटले की, ‘मराठी माणसाला प्राधान्याने घर मिळायाल हवे, असा कायदा तयार करा, ४० टक्के घरे मराठी माणसाला परवडतील अशी बांधण्यासाठी आपण कायदा करणार आहात का? ‘कायदा केल्याशिवाय मराठी माणसाला न्याय मिळणार नाही. असा सवाल परब यांनी उपस्थित केला.
या प्रश्नावर उत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले की, “मुंबईत मराठी माणसाला सन्मान मिळावा, ही जशी तुमची भावना आहे तीच आमचीही भावना आहे. परंतु, २०१९ ते २०२२ या काळात तुमचे सरकार असताना हा कायदा का केला नाही? तुमच्या सरकारने मराठी माणसाकडे दुर्लक्ष केले”, असे देसाई म्हणाले. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. शाब्दिक चकमक इतकी वाढली की, अनिल परब यांनी शंभूराज देसाईंना “गद्दार” असे म्हंटले. त्या नंतर शंभूराज देसाईंनी “गद्दार कुणाला म्हणतो रे? बाहेर भेट मी बघतो” असे म्हणत अनिल परब यांना देसाईंनी ललकारले. हा वाद इतका वाढला की विधान परिषदेचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करावे लागले. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या वादातले आक्षेपार्ह शब्द रेकॉर्डवरुन काढून टाकत असल्याचे जाहीर केले.

