भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

महिलांचे नग्न व्हिडिओ काढून समाज माध्यमांवर केले व्हायलर, मुक्ताईनगर तालुक्यातील प्रकार

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यातील दोन महिलांना प्रेमाचे आमिष दाखवून त्यांना व्हिडिओ कॉल करीत त्यांचे नग्न व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि समाज माध्यमावर व्हायरल केल्याची घटना उघडकीस आली.

मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावामध्ये श्रीकृष्ण अनिल चिखलकर याने एका ३६ वर्षीय महिलेवर दबाव टाकून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर फोनवर व्हिडिओ कॉल करून तिला विवस्त्र होण्यास सांगून तिचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. व तो व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायलर केला.

तसेच आणखी दुसऱ्या एका तरुणीला देखील प्रेमाच्या जाळ्यात ओढून दबाव टाकत तिचा देखील विवस्त्र व्हिडिओ तयार केला. व तो व्हिडिओ सुद्धा समाज माध्यमांवर व्हायरल केला.

हा प्रकार महिलेला माहिती होताच यातील ३६ वर्षीय महिलेने मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार श्रीकृष्ण अनिल चिखलकर यांचेवर  मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक नागेश मोहिते हे पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!