भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

निमखेडी बुद्रुक येथे अवैध दारू बंदीसाठी महिलांचा एल्गार

सुकळी, ता. मुक्ताईनगर. मंडे टु मंडे न्युज. ज्ञानेश्वर सावळे | मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथे मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू असून अनेक लोक दारूच्या आहारी गेल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या त्रासाला कंटाळून गावातील महिलांनी दारूबंदी साठी एल्गार पुकारत मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला धडक देत निवेदन दिले.

गेल्या अनेक वर्षांपासून मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथे अवैध दारू धंद्यावाल्यांचा मोठा कहर झाला होता मोठ्या प्रमाणामध्ये धंद्यांमध्ये व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढत असताना गावांमध्ये मजुरांची संख्या जास्त असल्यामुळे अनेक मजूर नेहमी तास दारूच्या नशे मध्ये राहत होते. काही कामधंदे करत नसल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होत होते. कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना अक्षरशः महिलांचं सौभाग्याचं मंगळसूत्र सुद्धा काही दारू पिणाऱ्या लोकांनी मोडल्या गेले होते. गावात काही तरुण वृद्ध दारूच्या व्यसनाने मृत्यू पावलेले आहेत.काही दारुड्या लोकांनी स्वतःहून आत्महत्या केलेल्या आहेत .

दरम्यान, या संदर्भात गावातील महिलांनी पुढाकार घेत बैठकीचं आयोजन करण्यात आले. बैठकीत पोलीस पाटील सरपंच यांच्या सह चर्चा होऊन पोलिस स्टेशनला निवेदन देण्याचे ठरले.

त्या नुसार मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक नागेश मोहिते व एल सी बी चे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी सरपंच, पोलिस पाटील यांचे सह  गावातील बहुसंख्य महिला भगिनी पोलिस स्टेशनला उपस्थित होत्या. मुक्ताईनगर चे पोलीस निरीक्षक श्री नागेश मोहिते यांनी महिलांना शंभर टक्के दारू बंद करण्याचे आश्वासन महिला मंडळाला दिले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!