भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिकसामाजिक

ऐनपुर महाविद्यालयात “वित्तीय साक्षरता ” या विषयावर कार्यशाळा संपन्न

ऐनपूर, ता.रावेर.मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता समिती व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वित्तीय साक्षरता या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. सुरवातीला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

या कार्यशाळेचे आणि अर्थाशास्त्र मंडळाचे उद्घाटन महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ जे बी अंजने यांच्या शुभ हस्ते पार पडले. या कार्यशाळेत मा. श्री. ज्ञानेश्वर बढे यांनी वित्तीय साक्षरता या विषयावर मार्गदर्शन केले. यात त्यांनी कमी वयात केलेली फायदेशीर गुंतवणूक, एस आय पी, म्युच्युअल फंड या विषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच मा. प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी पैसे कमविण्यापेक्षा तो टिकवता आला पाहिजे व त्यात दरवर्षी भर पडलीच पाहिजे असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ एस एन वैष्णव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा हेमंत बाविस्कर यांनी केले.

सदर कार्यशाळेत महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे म्युच्युअल फंड चे खाते उघडण्यासाठी च्या प्रक्रियेला सुरवात झाली. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. विलास पाटील, ज्ञानेश्वर कोळी, प्रा. हेमंत बाविस्कर, डॉ. जयंत नेहेते, डॉ. संदीप साळुंके व सर्व प्राध्यापक वृंद आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!