फैजपुरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग : एकाविरोधात गुन्हा
फैजपूर ता. यावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस स्थानकात एका तरूणा विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे, ३० ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास शहरातील एका भागात आपल्या कुटुंबियासह राहिवासास असलेली १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी असतांना फैजपूर शहरातीलच एका अर्जून सिध्दार्थ केदारे नामक तरुणाने अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिचा जबरदस्ती हात पकडत सदरील तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तरुणाने मुलीचा विनयभंग केला. घडलेला प्रकार अल्पवयीन मुलीने कुटुंबियातील सदस्यांना सांगितल्यानंतर फैजपूर पोलीस स्थानकात पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.