यावल तालुक्यातील काही ग्राम पंचायतीच्या 14 वीत्त निधीचा गैरवापर ; कोट्यावधीचा निधी जातो कुठे…….?
कोरपावली ता.यावल (प्रतिनिधी)। ग्रामीण भागात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी १४ वित्त आयोगातून निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद असून, त्यानुसार “आमचं गाव आमचा विकास” या उपक्रमाअंतर्गत विकास कामांचा आराखडा तयार करून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येतो, त्या नुसार थेट ग्रामपंचयत खात्यात हा निधी जमा करण्यात येतो, मात्र निधीचा मोठा गैरवापर होत असल्याचे सर्व तालुक्यात बोलले जात आहे.
पूर्वी निधी अभावी गावाची विकास कामे खुंटली होती,पण आता मात्र लाखो रुपये निधी उपलब्ध होऊन सुद्धा विकास कामे हवी तसी झालेली नसल्याने निधी गैरमार्गाने खर्चित केला जातो, मराठी शाळेत, ऊर्दू शाळेत शालेय विद्यार्थी उपयोगी साहित्य उपलब्ध नसल्याचेही दिसून येते, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बचतगट स्थापन करणे आदी उपक्रमासाठी निधी खर्च केला नसल्याने ग्रामीण महिलांचा विकास खुंटल्याचे दिसून येते, या सारख्या अनेक योजना निधी उपलब्ध असूनही रखडलेल्या असल्याचे चित्र निर्माण झाले आहे, “ हा एवढा कोट्यावधीचा निधी जातो कुठे….? ” हा मोठा संशोधनाचा विषय बनला आहे. ” प्रशासकीय अधिकारी असून सुद्धा काही वेळा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी ग्रामीण भागातील ग्राम पंचायतीना भेटी देऊन पाहणी करून देखील त्यातून, काही सत्त्याता बाहेर येईल, असे वाटत असताना ,हा केवळ एक देखावा म्हणून खेळी मेळी असल्याचे ग्रामस्थांतून बोलले जात आहे, याची कसून चौकशी व्हावी अशी मागणी सर्वत्र जोर धरत आहे .