भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

खोटे भाऊ बहिण उभे करून १३ लाखात फसवणूक, यावल न्यायालयाने दिली ३ वर्ष ११ महिने कारावासाची शिक्षा

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l फैजपूर येथील उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) कार्यालयात यावल तालुक्यातील अंजाळे या गावातील एकाने एका प्रकरणात खोटे भाऊ बहिण उभे करून शासनाची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केली होती. ही घटना २०१९ मध्ये घडली होती. या प्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.आरोपी २०२० पासून तुरुंगात आहे. या गुन्ह्यात यावल न्यायालयात या व्यक्तीविरुद्ध आरोप सिध्द झाल्याने त्याला ३ वर्ष ११ महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

सन. २०१९ मध्ये फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयात एका प्रकरणात यावल तालुक्यातील अंजाळे येथील त्र्यंबक रामचंद्र सपकाळे यांनी खोटे बहिण व भाऊ उभे करून शासनाची सुमारे १३ लाखात फसवणूक केली. या बाबत उपविभागीय अधिकारी, फैजपूर यांनी त्र्यंबक रामचंद्र सपकाळे याचे विरुद्ध फैजपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल होऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यावल न्यायालयाचे सह दिवाणी न्या.व्ही.एस.डामरे यांच्या न्यायालयात गुन्ह्याचा खटला चालला. यात सरकारी वकिलांनी एकूण १७ साक्षीदार तपासले व संशयित आरोपी विरोधात गुन्हा सिध्द झाला. या खटल्यात न्या.व्ही. एस.डामरे यांनी त्रांबक सपकाळे या आरोपीस ३ वर्ष ११ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपी हा २०२० पासून तुरूंगात असल्याने उर्वरीत दिवस शिक्षेतून वगळण्यात येणार आहेत. खटल्याचे कामकाज सरकारी अभियोक्ता म्हणून निलेश लोखंडे यांनी पाहिले. पैरवी अधिकारी महिला पोलीस कर्मचारी सुशीला भिलाला यांनी पाहिले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!