भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

उकळते पाणी अंगावर पडून भाजलेल्या १ वर्षाच्या मुलीचा अखेर मृत्यू

यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील मालोद येथील १ वर्षाच्या लहान मुलीच्या अंगावर उकळते पाणी पडून गंभीर भाजली गेली होती.परंतु सुमारे १२ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत उपचारादरम्यान त्या मुलीचा अखेर मृत्यू झाला.

या बाबत मिळलेलीअधिक महिती आशी की, २१ एप्रिल रोजी सकाळी घरात चुलीवर अंघोळीसाठी पाणी तपाविण्यासाठी ठेवले असता अचानक चुलीवरील उकळते पाणी बाजूला असलेल्या आरती कैलास भील,वय १ वर्ष,रा मालोद, ता यावल,या मुलीच्या अंगावर पडल्याने ती गंभीर जखमी झाली,तिला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. गेल्या १२ दिवसांपासून ही मुलगी मृत्यूशी झुंज देत असताना अखेर सोमवार २ मे रोजी रात्री ११.३० वाजता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या संदर्भात जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून यावल पोलीस स्टेशनला नोंद वर्ग करण्यात आली आहे.या घटनेमुळे भील कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!