सावदा शहरात भर दिवसा फिल्मी स्टाईल १ लाखांची रोकड लंपास !
सावदा, ता. रावेर मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : शहरातील पंजाब बँकेच्या आवारातून भर दिवसा तालुक्यातील एका शेतकर्याकडे असणारी एक लाख रूपयांची बॅग चोरट्यानी डल्ला मारत पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शहरात बाजारपेठ असल्याने तालुक्यातील आजूबाजूच्या खेडे गावांतील नागरिक येत असतात गौरखेडा येथील रमेश यादव महाजन हे सावदा शहरातील पंजाब नॅशनल बँकेसमोरील आवारात १ लाखांची रोकड व काही महत्त्वाची कागदपत्रे बॅग त्यांच्या हातात होती. यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी महाजन यांना तुमच्या मागे पैसे पडले असल्याची बतावणी केली व महाजन यांचे लक्ष विचलित केले.
यादरम्यान दोघांनी त्यांच्या हातातील पैसे असलेली पिशवी हिसकावून पसार झाले. ही घटना काही त्यांच्या लक्षात येताच महाजन यांनी आरडा-ओरडा केला तोवर चोरट्यानी पळ काढला होता. याप्रकरणी सावदा पोलीस स्थानकात दोन अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.


