भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी यावल येथे २४ जानेवारीला हिंदुसंघटनशक्तीचा आविष्कार !

यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भारताच्या संविधानात प्रस्तावनेत प्रत्येक नागरिकाला समता, बंधुता आणि न्याय मिळेल, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात आपल्या देशात अल्पसंख्य आयोग, सच्चर आयोग, अल्पसंख्यांक विकास मंत्रालय आहे; मात्र बहुसंख्य हिंदूंना कोणतेही संरक्षण देणारे मंत्रालय-आयोग नाही. मुसलमान आणि ख्रिस्ती यांना धार्मिक शिक्षण देणार्‍या शाळांना सरकारी अनुदान, तर हिंदूंना भगवत्गीतेसह धार्मिक शिक्षण देण्यावरच आक्षेप आहे !

देशभरात केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण, तर मशिदी-चर्चचे सरकारीकरण का नाही ? अल्पसंख्याकांना धर्माच्या आधारावर शैक्षणिक अनुदान, मग बहुसंख्य हिंदूंनी काय अपराध केला आहे ? हे सर्व पहाता भारतात खरोखरच ‘सेक्युलर’ व्यवस्था अस्तित्वात आहे का ? हिंदूंच्या हजारो युवतींना उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद म्हणजे ‘लव्ह जिहाद’. भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे संकट ‘हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूंवर होणार्‍या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मंगळवार २४ जानेवारी या दिवशी सायंकाळी ५ वाजता स्वामी नारायण मंदिरासमोर, फालक नगर स्टॉप येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी दिली. या सभेत वक्ता म्हणून सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र – छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट, रणरागिणी कु. रागेश्री देशपांडे हे संबोधित करतील.

या सभेच्या ठिकाणी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाच्या संदर्भात माहिती देणारे फलक, क्रांतीकारकांबद्दल माहिती देणारे फलक, काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचे फलक; यांसह हिंदूंना प्रतीदिन करावयाच्या धर्माचरणाच्या कृती, साधना यांविषयी मार्गदर्शन करणारे फलक प्रदर्शन लावण्यात येणार आहे. तसेच हिंदु जागृती करणार्‍या ग्रंथांचे, तसेच हिंदूंना धर्मशिक्षण देणार्‍या विविध ग्रंथांचे प्रदर्शनही लावण्यात येणार आहे.

गेले महिनाभर यावल शहर आणि तालुक्यातील अनेक गावांत विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. भित्तीपत्रके, हस्तपत्रके, होर्डिंग, फलकलेखन, सामाजिक संकेतस्थळ यांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर सभेचा प्रसार चालू आहे. अनेक युवक धर्मरक्षणाच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!