यावल खरेदी-विक्री संघ निवडणुकीत महायुती पॅनलला १७ पैकी १६ जागा
यावल,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। यावल खरेदी-विक्री संघाच्या १७ जागांसाठी काल मतदान झालं,यात महाविकास आघाडी प्रणीत शेतकरी विकास आणि महायुतीचे सहकार या दोन पॅनल मध्ये लढत झाली, आज झालेल्या मतमोजणीत भाजप प्रणीत पॅनलने मोठे यश संपादन करत १७ पैकी १६ जागा मिळवून बहुमत प्राप्त केले,तर मविआ प्रणीत पॅनलला १ जागा मिळाली.
आज महर्षी श्री व्यास महाराज यांच्या मंदीराच्या सभागृहात झालेल्या मतमोजणीत महायुतीने पहिल्यापासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत १५ जागा मिळवल्या,या आधी एक जागा बिनविरोध झाल्याने एकूण १६ जागा मिळविल्या, विरोधकांनी एकच जागा मिळून त्यात माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांना विजय मिळविता आला.
नरेंद्र विष्णू नारखेडे, उमेश रेवा फेगडे, हेमराज जगन्नाथ फेगडे, धनंजय यशवंत फिरके, तेजस धनंजय पाटील, नारायण शशिकांत चौधरी, अतुल भागवत भालेराव, पांडुरंग दगडू सराफ, प्रवीण भास्कर वारके, नरेंद्र वामन कोल्हे, प्रशांत लिलाधर चौधरी, सुनील बाळकृष्ण नेवे, सागर राजेंद्र महाजन, आरती शरद महाजन, नयना चंद्रशेखर चौधरी हे भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाले असून यावल चे माजी नगराध्यक्ष अतुल वसंत पाटील हे मविआ चे उमेदवार अवघ्या दोन मतांनी विजयी झाले आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सहकार पॅनलने सर्व जागा जिंकून मविआला जबरदस्त धक्का दिला आहे.